‘युनायटेड गोवन्स’ बाबूश यांचा नवा पक्ष

0
94

>> गोवा फॉरवर्डशी युती करणार : बाबूश

 

आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आपण नव्या पक्षाची स्थापना करणार असून आपला पक्षा गोवा फॉरवर्ड या पक्षाशी युती करणार असल्याचे सांताक्रुझ मतदारसंघाचे आमदार बाबुश मोन्सेर्रात यांनी काल सांगितले. युनायटेड गोवन्स असे आपल्या पक्षाचे नाव असेल, असे ते म्हणाले. आपण यंदा मतदारसंघही बदलणार असून पणजी मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे ते म्हणाले.
सांताक्रुझ मतदारसंघातून आपल्या एखाद्या मित्राला आपण उमेदवारी देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्नी जेनीफर मोन्सेर्रात कुठच्या पक्षातर्फे निवडणूक लढवणार आहे, असे विचारले असता त्याचा निर्णय त्याच घेणार असल्याचे मोन्सेर्रात यांनी स्पष्ट केले. पक्ष स्थापनेसाठीची प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण केली आहे, असेही त्यांनी सांगितले. गोवा फॉरवर्ड पार्टीचे नेते विजय सरदेसाई हे आपले जुने मित्र असून युती संदर्भात त्यांच्याशी यापूर्वीच आपली बोलणी झाली असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी निवडणूक लढलेले काही जण तसेच काही युवक यांना आपल्या पक्षात स्थान असेल असे मोन्सेर्रात यांनी स्पष्ट केले.