बारामुल्ला येथे दोघा दहशतवाद्यांचा खात्मा

0
66

जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला येथे काल रात्री उशिरा लष्कराच्या तळावर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात दोघा अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले. या चकमकीवेळी दोन जवान जखमी झाले आहेत. अतिरेकी व लष्करामध्ये अंदाधुंद गोळीबार रात्री उशिरापर्यंत सुरू होता. दहशतवाद्यांनी राष्ट्रीय रायफल्सच्या युनिट ४६ वर हल्ला केला आहे. हे युनिट काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले परतवून लावण्याचे काम करते. हल्ला रात्री १०.४५ ते ११ दरम्यान झाला. दहशतवाद्यांनी तळावर हातगोळे फेकले. यानंतर भारतीय जवानांनी गोळीबार करत चोख प्रत्युत्तर दिले आहे. या हल्ल्यात दोन ते चार आतंकवादी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.