यश फडते अजिंक्य

0
65

गोव्याचा युवा स्क्वॉशपटू यश फडते याने अंडर १७ युएस ज्युनियर ओपन स्क्वॉश स्पर्धा जिंकून इतिहास रचला आहे. अंतिम फेरीत त्याने भारतीय वंशाचा अमेरिकास्थित खेळाडू व द्वितीय मानांकित आयुष मेनन याचा ११-८, १-११, ११-६, १-८ असा पराभव करत गोमंतकीयांची मान उंचावली. उपांत्य फेरीत यश याने अव्वल मानांकित लुईस अँडरसन याला धूळ चारत अंतिम फेरी गाठली होती. ही प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू होण्याचा मान यश याने मिळविला आहे. देशात चौथ्या स्थानावर असलेल्या यश याने १२८ खेळाडूंच्या या स्पर्धेत आपल्यापेक्षा सरस खेळाडूंवर कुरघोडी करत हे घवघवीत यश प्राप्त केले आहे. इंग्लंडमधील बर्मिंघम येथे ३ ते ७ जानेवारी या कालावधीत होणार्‍या ब्रिटीश ज्युनियर ओपन स्पर्धेत तो सहभागी होणार आहे. अन्य भारतीयांमध्ये १९ वर्षांखालील गटात आदित्य राघवन याला अंतिम फेरीत अव्वल मानांकित लायोनेल कार्डेनास या मेक्सिकोच्या खेळाडूकडून १३-११, ११-२, ११-५ असे पराजित व्हावे लागले.