उत्तर प्रदेशातील मथुरा येथे काल पहाटे यमुना एक्स्प्रेसवे वर झालेल्या भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला, तर 25 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. दाट धुक्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती असून, आग्रा ते नोएडा दिशेने जाणाऱ्या 8 बस आणि 3 कार एकमेकांवर आदळल्या. धडक इतकी जोरदार होती की, काही वाहनांना भीषण आग लागली. हा अपघात आग्रा-नोएडा मार्गावर बलदेव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडेहरा गावाजवळ घडला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि प्रशासनाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य युद्धपातळीवर राबवण्यात आले. अपघातात जखमी झालेल्या 25 प्रवाशांना रुग्णवाहिकांद्वारे जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.