Home बातम्या पश्चिम बंगालच्याक्रीडामंत्र्यांचा राजीनामा

पश्चिम बंगालच्याक्रीडामंत्र्यांचा राजीनामा

0

सॉल्ट लेक स्टेडियमवर आयोजित फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सी याच्या कार्यक्रमात शनिवारी प्रचंड गोंधळ झाला होता. याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले होते. त्याचदरम्यान, राज्याचे क्रीडामंत्री अरुप बिस्वास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बंगालचे क्रीडामंत्री अरुप बिस्वास यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सॉल्ट लेक स्टेडियमवरील गोंधळाबरोबरच युवा भारती घोटाळ्याभोवती सुरू असलेल्या वादात अरुप बिस्वास यांना क्रीडा खाते सोडण्यास सांगण्यात आले होते.