म्हादई नदीच्या संवर्धनासाठी आरजी लढणार ः परब

0
7

रेव्होल्युशनरी गोवन (आरजी) या प्रादेशिक पक्षाने येथील आझाद मैदानावर म्हादई पाणी प्रश्‍नी एका जागृती कार्यक्रमाचे आयोजन काल केले.

टुगेदर फॉर म्हादई आंदोलनाअंतर्गत आरजी म्हादईच्या संवर्धनासाठी लढा देणार आहे. म्हादई नदीबाबत घरोघरी जाऊन जागृती केली जाणार आहे. तसेच, सह्यांची मोहीम राबविण्यात येणार आहे, असे प्रतिपादन आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी जागृती कार्यक्रमात बोलताना केले. म्हादईचे पाणी वळविल्यास गोव्यातील जलस्रोतांवर तसेच त्याचा पर्यावरण, वनस्पती आणि जीवजंतूंवर दुष्परिणाम होणार आहे, असे परब यांनी सांगितले. भाजप सरकार आमच्या म्हादई नदीला न्याय देऊ शकत नाही.

भाजपकडून म्हादईप्रश्‍नी राजकारण खेळले जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीसुद्धा म्हादई प्रश्‍नाकडे लक्ष दिले नाही, अशी टीका मनोज परब यांनी केली. म्हादईप्रश्‍नी एकजुटीने लढा देण्याची गरज आहे, असे सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी सांगितले. या जागृती कार्यक्रमात म्हादई नदीचे पाणी वळविल्यास होणार्‍या दुष्परिणांबाबत सादरीकरण करण्यात आले.
म्हादई नदीच्या संवर्धनासाठी आरजी लढणार ः परब

रेव्होल्युशनरी गोवन (आरजी) या प्रादेशिक पक्षाने येथील आझाद मैदानावर म्हादई पाणी प्रश्‍नी एका जागृती कार्यक्रमाचे आयोजन काल केले.

टुगेदर फॉर म्हादई आंदोलनाअंतर्गत आरजी म्हादईच्या संवर्धनासाठी लढा देणार आहे. म्हादई नदीबाबत घरोघरी जाऊन जागृती केली जाणार आहे. तसेच, सह्यांची मोहीम राबविण्यात येणार आहे, असे प्रतिपादन आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी जागृती कार्यक्रमात बोलताना केले. म्हादईचे पाणी वळविल्यास गोव्यातील जलस्रोतांवर तसेच त्याचा पर्यावरण, वनस्पती आणि जीवजंतूंवर दुष्परिणाम होणार आहे, असे परब यांनी सांगितले. भाजप सरकार आमच्या म्हादई नदीला न्याय देऊ शकत नाही. भाजपकडून म्हादईप्रश्‍नी राजकारण खेळले जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीसुद्धा म्हादई प्रश्‍नाकडे लक्ष दिले नाही, अशी टीका मनोज परब यांनी केली. म्हादईप्रश्‍नी एकजुटीने लढा देण्याची गरज आहे, असे सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी सांगितले. या जागृती कार्यक्रमात म्हादई नदीचे पाणी वळविल्यास होणार्‍या दुष्परिणांबाबत सादरीकरण करण्यात आले.

म्हादई प्रश्‍नावर एक दिवस
चर्चा हवी ः युरी आलेमाव

गोवा विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीपूर्वी सभापती रमेश तवडकर यांना एक लेखी निवेदन सादर करून विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात म्हादई पाणी प्रश्‍नावर एक दिवस चर्चा करण्याची मागणी करणार आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे. राज्य सरकारने म्हादई प्रश्‍नी आयोजित केलेल्या सर्व आमदारांच्या बैठकीला विरोधी पक्षाच्या आमदारांनी उपस्थिती लावली नव्हती. आता, नागरिकांकडून आमदारांवर दबाव येत असल्याने विरोधी पक्षनेते आलेमाव यांनी म्हादई प्रश्‍नी चर्चेच्या मागणीसाठी सभापतींना निवेदन देण्याची जाहीर केले आहे.