म्हादई : गोव्यातफेर् आज लवादासमोर स्पष्टीकरण

0
95

म्हादईप्रश्‍नी कर्नाटकाने आता फसवेगिरी व धमकीसत्राचा अवलंब सुरू केला असून या प्रकरणाची राज्याचे मुख्यमंत्री व पर्यावरणमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे.

लवादाला वेगवेगळ्या पध्दतीने सादरीकरण करत नवनवीन हालचाली कर्नाटकाने सुरू केल्या असून म्हादईचे ७ टीएमसी पाणी मलप्रभेत वळवण्यासाठी कर्नाटकाने जी हस्तक्षेप याचिका सादर केली त्याबाबत गुंता वाढलेला आहे. मलप्रभा खोर्‍याची क्षमता ४७.२५५ टीएमसी असल्याच कर्नाटकाने लवादाला कळवले असले तरी प्रत्यक्षात हे प्रमाण २७ टीएमसी असल्याची माहिती ऍड. जनरल आत्माराम नाडकर्णी यांनी दिली.
कर्नाटकाने केलेल्या दाव्याच्या प्रतिवादावर स्पष्टीकरण देण्यासाठी सोमवारी गोव्यातर्फे सोमवारी गोव्यातर्फे लवादाला सादर करण्यात येणार असल्याचे नाडकर्णी यानी सांगितले. एकीकडे मलप्रभेत पाण्याची कमतरता असल्याचा दावा करणारे कर्नाटक विसंगत माहिती लवादासमोर सादर करत असून त्याची माहितीही लवादाला देणार असल्याचे नाडकर्णी यांनी
सांगितले. म्हादई प्रश्‍न गोव्यासाठी प्रतिष्ठेचा बनलेला असताना कर्नाटकाकडू अधिकारी व सरकारी वकीलांना धमक्या येत असल्याचा कृतीची मुख्यमंत्र पार्सेकर यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी कर्नाटकाने पोलीस प्रमुखांना सर्तक केले आहे.
गोव्याची बाजू भक्कम असल्याने कायदा होत लवादासमो येऊ नये यासाठी धमकी सत्र सुरू करण्यात आले असून याप्रकरणी कर्नाटकसरकारला पत्र लिहीण्याच्या सूचना मुख्य सचिवांना केल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्र्यांना व संबंधित खात्याखाली पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे पार्सेकर यांनी सांगितले. दरम्यान पर्यावरणमंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी कर्नाटकाच्या या कृतीबाबत आक्षे घेतला असून याप्रकरणी सविस्तर माहिती देऊन संबंधिताना कळविण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.