म्हादईप्रश्‍नी सुनावणीस आजपासून पुन्हा प्रारंभ

0
83

म्हादई पाणी तंटाप्रश्‍नी आजपासून सुनावणी होत आहे. गोव्याने नवीन प्रतिज्ञापत्र सादर करताना सात नव्या साक्षीदारांची नावे दिली असून गरज भासल्यास त्यांना पाचारण करण्यात येणार आहे.

आज चेतन पंडित यांची उलट तपासणी पुढे चालू होण्याची शक्यता असून इतर बाबतीतही कर्नाटक उलटतपासणी घेण्याची शक्यता आहे.
गोव्याची बाजू भक्कमपणे मांडणार्‍या भारताचे अतिरिक्त सोलीसीटर जनरल आत्माराम नाडकर्णी यांनी गोव्यातर्फे विविध क्षेत्रातील तब्बल सात साक्षीदार लवादासमोर हजर करण्याची तयारी चालविली असून गोव्याची बाजू मजबूत असल्याचे स्पष्ट केलेले आहे. गोव्याचे साक्षीदार चेतन पंडित यांनी अभ्यासपूर्ण सादरीकरण केले आहे. गोव्याची बाजू मजबूत झालेली असताना महाराष्ट्र व कर्नाटक यांच्याबरोबरच गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी संयुक्त पत्रे पाठवून पाणी वाटपाबाबत सुवर्ण मध्य साधण्याच्या लवादाने दिलेल्या सूचना गोव्याला त्रासदायक ठराल्या आहेत. गोव्याने लवादाचा निर्णय होईपर्यंत याबाबतीत कसलीच
तडजोड व लवादाच्या कक्षेबाहेर कसलीच भूमिका घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
मात्र मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी चर्चेस तयार असल्याचे स्पष्ट केले आहे.
पर्यावरण कार्यकर्ते राजेंद्र केरकर, अभियानाच्या अध्यक्षा निर्मला सावंत यांनी तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पाणी वाटपाबाबत निर्णय घेण्याच्या भूमिकेला आक्षेप घेतलेला असून त्यामुळे आतापर्यंतच्या सक्रीय पाठपुराव्यालाच सुरुंग लागणार असल्याचे म्हटले आहे.
कर्नाटकाची बाजू कावेरी प्रश्‍नी लंगडी झालेली असताना म्हादईप्रश्‍नीही गोव्याची बाजू भक्कम झालेली आहे. त्यामुळे हा प्रश्‍न सोडवण्यास कर्नाटक तयार झालेला आहे. आता यापुढे लवादाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.