चार दहशतवाद्यांना काश्मीरात कंठस्नान

0
88

>> चकमकीत एक पोलीस शहीद

 

जम्मू-काश्मीरात काल भारतीय जवानांनी दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावताना चौघा दहशतवाद्यांचा खात्मा केला. मात्र पूँछमधील दहशतवाद्यांशी उडालेल्या चकमकीत एक पोलीस शहीद झाला.
नौगांव विभागातील हुंदवाडा भागातील नियंत्रण रेषेनजीक दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने फोल ठरवला. दहशतवाद्यांनी नौगांव, गुरेज व तंगधार येथून भारतीय हद्दीत घुसण्याचे प्रयत्न चालवले होते. यावेळी भारतीय लष्कराच्या जवानांनी केलेल्या कारवाईत ४ दहशतवादी ठार झाले. दहशतवाद्यांकडील शस्त्रास्त्रे व मोठ्या प्रमाणातील दारूगोळा ताब्यात घेण्यात आला.
त्याआधी पूूँछ जिल्ह्याच्या अल्लाह पीर भागात सकाळच्या वेळी बांधकाम चालू असलेल्या एका इमारतीत दहशतवादी घुसले व त्यांनी पोलिसांवर बेछूट गोळीबार केला. त्यात पोलीस कॉंस्टेबल संदीप कुमार शहीद झाले. तर उपनिरीक्षक मंजूर अहमद गंभीर जखमी झाले.