दवर्ली येथील बारमध्ये युवकाचा भोसकून खून

0
210

दवर्ली येथील एका बारमध्ये दारू पिण्यास गेलेल्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीचे पर्यावसान एका तरूणाच्या खूनात झाले. मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री ११.३० च्या सुमारास काहीजण दवर्लीतील एका बारमध्ये दारू पिण्यास गेले होते. त्यांच्यातील दोन गटांमध्ये बाचाबाचीचे पर्यावसान हाणामारीत झाले. त्यात एकाने रिबेलो नामक ३० वर्षीय युवकाला भोेसकल्याने त्याचे निधन झाले.