मोदी-जिनपिंग चर्चेत शांतता राखण्यावर एकमत

0
131

ब्रिक्स परिषदेच्या दुसर्‍या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे राष्ट्राध्यक्ष शि जिनपिंग यांच्या झालेल्या द्विपक्षीय चर्चेत दोन्ही देशांच्या सीमेवर शांतता कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यावर एकमत झाले. चर्चेनंतर परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी चर्चेविषयी माहिती दिली. दोन्ही देशातील सैन्यांमध्ये ताळमेळ ठेवण्यावर एकमत झाले. द्विपक्षीय संबंध चांगले राहण्यासाठी सीमेवर शांतता राखणे आवश्यक असल्याचे दोन्ही देशांनी मान्य केले असल्याचे जयशंकर यांनी सांगितले.