मोदींना लता मंगेशकर पुरस्कार प्रदान

0
17

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने देण्यात येणारा पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले, उषा मंगेशकर आणि आदिनाथ मंगेशकर यांच्या हस्ते पंतप्रधान मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना पंतप्रधानांनी, पुरस्कार, सन्मान स्वीकारणे यांपासून मी जरा दूरच असतो.

मात्र लतादीदींसारख्या मोठ्या बहिणीच्या नावाने हा पुरस्कार आहे म्हणून येथे येणे माझे कर्तव्य आहे, असे सांगून हा पुरस्कार मी सर्व देशवासीयांना समर्पित करत असल्याचे म्हटले. या कार्यक्रमात मंगेशकर कुटुंबीयांसह राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते.