मोदींचे मुख्य सल्लागार सिन्हा यांचा राजीनामा

0
133

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सल्लागार पी. के. सिन्हा यांनी काल वैयक्तिक कारणांमुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला. सिन्हा यांना सप्टेंबर २०१९ मध्ये पंतप्रधानांच्या मुख्य सल्लागारपदी नियुक्त करण्यात आले होते. भारतीय प्रशासकीय सेवेच्या १९७७ च्या तुकडीचे ते अधिकारी होते. त्यांनी या अगोदर पंतप्रधान कार्यालयात ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी म्हणूनही काम केले असून ते ऊर्जा मंत्रालयात सचिवपदी देखील कार्यरत होते. तसेच, त्यांना चार वर्र्षेें मंत्रिमंडळ सचिव म्हणूनही काम केलेले आहे. तसेच यापूर्वी विविध महत्वांच्या पदावर काम केले आहे.