मुख्यमंत्र्यांनी घेतली अर्थसंकल्पपूर्व बैठक

0
63

येत्या २४ मार्च रोजी गोवा विधानसभेत अर्थसंकल्प सादर करण्यात येणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या मंत्र्यांसोबत अर्थसंकल्पपूर्व बैठक घेतली. यावेळी आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे, वीजमंत्री नीलेश काब्राल, पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो, जलसंसाधनमंत्री फिलिप नेरी रॉड्रिगीस व सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर उपस्थित होते. उपस्थितांनी आपल्या खात्यांसाठी किती निधी अपेक्षित आहे याची माहिती दिली.
यापूर्वीच उद्योगपती, तसेच अन्य घटकांच्या अर्थसंसकल्पाकडून काय अपेक्षा आहेत हे मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतले आहे.