Home बातम्या मोटरसारयकल चोरीप्रकरणी एक वर्ष तुरुंगवास

मोटरसारयकल चोरीप्रकरणी एक वर्ष तुरुंगवास

0

मोटरसायकल चोरीचा आरोप सिद्ध झाल्याने मडगावच्या प्रथम श्रेणी न्यायालयाने आंबावली केपे येथील दीपेश केरकर याला एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. याशिवाय रु. ३ हजार दंड बजावला असून तो न भरल्यास सहा महिने अतिरिक्त तुरुंगवास भोगावा लागेल.

जोसेफ मार्टिन यांची मोटरसायकल चोरीला गेली होती. या प्रकरणी मडगाव पोलीस स्थानकात तक्रार दिल्यानंतर ६ सप्टेंबर रोजी दीपेशला अटक करुन दुचाकी जप्त केली होती.