Home बातम्या प्रियोळ व मडकईत उमेदवार उभे करण्याची कॉंग्रेसची मागणी

प्रियोळ व मडकईत उमेदवार उभे करण्याची कॉंग्रेसची मागणी

0

मगोने कॉंग्रेसशी युती करण्यास नकार दिल्याने कॉंग्रेसने प्रियोळ व मडकई मतदारसंघातून उमेदवार उभे करण्याची तयारी केली आहे. प्रियोळमधून लोककलाकार कांता गावडे यांनी निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक म्हणून अर्ज सादर केला आहे.

गावडे यांनी मतदारांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. मगोचे दीपक ढवळीकर या मतदारसंघाचे आमदार आहेत. आमदार पांडुरंग मडईकर यांचे बंधू धाकू मडकईकरही या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.

दरम्यान, आज प्रदेश निवडणूक समितीची बैठक होणार असून या बैठकीत वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्यांच्या अर्जावर विचार होईल.

दरम्यान, मडकई मतदारसंघासाठी रामचंद्र मुळे, उर्मिला नाईक, विनोद पोकळे व रितेश नाईक यांनी अर्ज केले आहेत.