मोईनच्या जागी लिच

0
86

>> ‘लॉडर्‌‌स’साठी इंग्लंड संघात बदल

ऑस्ट्रेलियाविरुद्ध लॉडर्‌‌स येथे १४ ऑगस्टपासून होणार्‍या दुसर्‍या ऍशेस कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने अष्टपैलू मोईन अली याला वगळले आहे. त्याच्या जागी सॉमरसेटचा डावखुरा फिरकीपटू जॅक लिच याचा १२ सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. जेम्स अँडरसन व ओली स्टोन यांना दुखापतीमुळे अपेक्षेप्रमाणे स्थान मिळालेले नाही. एजबेस्टन येथे पहिल्या कसोटीत मोईनला १७२ धावा मोजून केवळ तीन गडी बाद करता आले होते. फलंदाजी त्याने ० व ४ अशा धावा केल्या होत्या. या कसोटीच्या दोन्ही डावात नॅथन लायनने त्याला तंबूचा रस्ता दाखविला होता. इंग्लंडने १२ खेळाडूंमध्ये जोफ्रा आर्चरचा समावेश केला आहे. त्यामुळे जेम्स अँडरसन याची जागा त्याला मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे ऐतिहासिक लॉडर्‌‌सवर तो आपले कसोटी पदार्पण करेल. आर्चरने आपली तंदुरुस्ती सिद्ध करण्यासाठी नुकताच ससेक्स सेकंड इलेव्हन संघाकडून तीन दिवसीय सामन्यात खेळताना १०६ धावांत ७ गडी बाद करताना फलंदाजीत शतक देखील ठोकले आहे. इंग्लंडने वेगापेक्षा वैविध्यतेला प्राधान्य दिल्यास डावखुरा स्विंग गोलंदाज सॅम करनला खेळविण्याचा पर्यायही खुला आहे.
इंग्लंड संघ ः ज्यो रुट, जोफ्रा आर्चर, जॉनी बॅअरस्टोव, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जोस बटलर, सॅम करन, ज्यो डेन्ली, जॅक लिच, जेसन रॉय, बेन स्टोक्स व ख्रिस वोक्स.