मेरूचे मांस विक्रीस आणणार्‍यांना अटक

0
93
चोपडे-शिवोली पुलावर मेरूचे मांस संशयितांकडून वन खात्याच्या अधिकार्‍यांने पकडले. (छाया : निवृत्ती शिरोडकर)

वनअधिकार्‍यांनी पाठलाग करून चोपडे येथे पकडले
पेडणे वनखात्याने शिवोली-चोपडे पुलावर काल सकाळी ११ वाजता वाहनांचा पाठलाग करून साडे तेहत्तीस किलो मेरूचे मांस, स्वीफ्ट कार, मोबाईल संच जप्त करण्याबरोबरच अमोल गणेश नाईक (२३), (कातोडवाडा-तुये), शांताराम सुभाष नाईक (कातोडवाडा-तुये) व आशिष अशोक बांदेकर (माऊसवाडा-पेडणे) या तिघांना अटक केली. त्याना दोन दिवसांची कोठडी देण्यात आली आहे.
सविस्तर माहितीनुसार जीए- ०३- एच- ९१८७ या स्वीफ्ट गाडीतून सिंधुदुर्गमधून चोपडे-शिवोलीमार्गे हणजुणला मेरूचे मांस घेऊन जात असल्याची माहिती वन खात्याला मिळाली. माहिती मिळताच चोपडे जंक्शनवर पेडणे वन विभाग अधिकारी विलास गांवस, वामन प्रभू, योगेश गोकर्णकर, रमाकांत सावंत, शैलेश गवंडी, अशोक घोगळे आदी अधिकारी संशयितांचा शोध घेण्यासाठी थांबले होते. ११ च्या दरम्यान एका स्वीफ्ट गाडीने ओवरटेक केले. त्यावेळी संशय आल्याने वन खात्याच्या अधिकार्‍यांनी पाठलाग करून चोपडे-शिवोली पुलावर सदर वाहन अडवले व तपासणी केली असता गाडीच्या डिकीत ३२ किलो ५०० ग्रॅम मांस मिळाले. सदर मांस सिंधुदुर्गातून आणून ते हणजुण येथे वितरीत करायची त्यांची तयारी होती. त्याना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना २ दिवस कोठडी देण्यात आली.