मेघालयात ११ दिवसांपासून ५ कामगार अडकले खाणीत

0
96

मेघालयच्या पूर्व जयंतिया हिल्स जिल्ह्यातील एका खाणीत पाच कामगार गेल्या ११ दिवसांपासून अडकले आहेत. खाणीतील पाण्याची पातळी कमी झाली असली तरी कामगारांना बाहेर काढण्यासारखी परिस्थिती नसल्याचे अधिकार्‍यांनी काल सांगितले. डायनामाइटच्या स्फोटामुळे खाण खचली होती.

त्यामुळे येथे पाच खाण कामगार अडकले असून सतत कोसळणार्‍या पावसामुळे बचाव पथकाला कामगारांना बाहेर काढण्यास अडचणी येत आहेत. गेल्या ११ दिवसांपासून पाच खाण कामगार बेकायदा असलेल्या कोळशाच्या खाणीत अडकले आहेत. स्फोटानंतर खाणीत पाण्याची पातळी वाढली व त्यात हे कामगार अडकले. सध्या पाण्याची पातळी कमी झाली असली तरी बचाव पथकाला आत काम सुरू करण्यासाठी पुरेशी जागा नाही.

दरम्यान, बचाव कार्यात थोडी प्रगती होत असली तरी वेळ खूप लागत आहे. त्यामुळे आम्ही नौदलाची मदत उपलब्ध करुन देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाला पत्र लिहिल्याचे मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड के. संगमा यांनी सांगितले.