केंद्रीय मंत्रिमंडळात बदलांची शक्यता?

0
117

केंद्रीय मंत्रिमंडळात बदलांची शक्यता असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडलेल्या मंत्रालयांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी अनेक बैठका घेतल्या आहेत. विशेषत: या बैठका कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेदरम्यान घेण्यात आल्या. काल शुक्रवारी संध्याकाळी गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासमवेत पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या बैठकीत मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर आता मंत्रिमंडळात मोठ्या बदलांची शक्यता आहे.

पुढील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक होत असून त्यादृष्टीने मोदी सरकार प्रयत्न करत आहे. पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी आपल्या ७ लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी पाच मंत्रालयांसमवेत ७ मंत्रालयांची बैठक घेतली.
दरम्यान, आज शनिवारी धर्मेंद्र प्रधान, नरेंद्र सिंह तोमर, गजेंद्र सिंह शेखावत, महेंद्र नाथ पांडेय, हरदीप पुरी यांच्यासोबत मोदी चर्चा करणार आहेत.