मुरगाव बंदरात सहारा इंडियाचे प्रवासी जहाज बुडताना वाचले

0
91

मुरगाव बंदरात वेस्टर्न इंडिया शिपयार्डमध्ये दुरुस्तीसाठी आणून ठेवलेले सहारा इंडियाचे ‘एम. व्ही. क्विंग’ जहाज काल सकाळी बुडता बुडता वाचले. सदर घटना जहाजात पाणी भरल्याने घडली. जहाजातील भरलेले पाणी बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

सहारा या कंपनीचे वरील प्रवासी जहाज वेस्टर्न इंडिया शिपयार्डमध्ये ९ जानेवारी २००४ रोजी दाखल झाले होते. दरम्यान, या कंपनीचे मालक उद्योगपती सुब्रोतो रॉय एका प्रकरणात अडकून कारागृहाची हवा खात असल्याने दुरुस्तीसाठी ठेवण्यात आलेल्या जहाजाचे दुरुस्ती बिल न ङ्गेडल्याने या जहाजाचे दुरुस्ती काम स्थगित ठेवण्यात आले आहे. त्यानुसार गेली अडीच वर्षे हे जहाज तसेच वेस्टर्न इंडियामध्ये पडून आहे. शिपयार्डच्या तरंगत्या धक्क्यानजिक हे जहाज नांगरून ठेवले आहे. दरम्यान, गेले दोन तीन दिवस पडत असलेल्या पावसामुळे या जहाजात पाणी तुंबून राहिल्याने काल सकाळी अचानक हे जहाज एका बाजूने कलंडून बुडण्याच्या स्थितीत होते. शिपयार्डमधील कामगारांनी वेळीच प्रसंगावधान राखून जहाज दोरखंडाने बांधून ठेवल्याने ते बुडण्यापासून बचावले.
दरम्यान, याविषयी माहिती एमपीटी अधिकार्‍यांना मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन पाहणी केली. भारतीय तटरक्षक दल गोवा विभागाच्या अधिकार्‍यांनीही यार्डात येऊन पाहणी केली. हे जहाज बुडाले असते तर मोठा अनर्थ घडला असता असे येथील वेस्टर्न इंडिया कंपनी कामगारांनी सांगितले. जवळ जवळ अडीच ते तीन हजार प्रवाशांची क्षमता असलेले हे जहाज अडीच वर्षांपासून धक्का अडवून आहे.