इस्तंबुल ः दहशतवादी हल्ल्यात ४१ ठार

0
101

तुर्कस्थानमधील इस्तंबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या आत्मघाती हल्ल्यात ४१ जणांचा मृत्यू, तर २३९ नागरिक जखमी झाले आहेत. तुर्कस्तानच्या स्थानिक वेळेनुसार मंगळवारी रात्री उशिरा तीन आत्मघाती स्फोटांनी इस्तंबुलचे विमानतळ हादरले. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असून, आससिस या जहाल दहशतवादी संघटनेने हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप तुर्कस्तानचे पंतप्रधान बिनानी यिल्दिरीम यांनी केला आहे. अतातुर्क विमानतळावर तीन आत्मघातकी दहशतवादी टॅक्सीतून उतरले. त्यानंतर त्यांनी एकामागोमाग स्वत:ला स्फोटा उडवून दिले. तत्पूर्वी, या तिघांनी विमानतळावर अंदाधुंद केलेल्या गोळीबारात नागरिकांचे बळी गेले. या गोळीबारात तीनपैकी दोघे दहशतवादी आंतरराष्ट्रीय टर्मिनलवर तर एक दहशतवादी पार्किंग तळाजवळ होता. या दहशतवाद्यांची ओळख पटली नसली तरी ते विदेशी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

ऋतिक रोशन बचावला
अतातुर्क विमानतळावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यातून बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन थोडक्यात बचावला आहे. हल्ल्यापूर्वी काही वेळ अगोदरच विमानतळावरून इकॉनॉमी क्लासने भारतात परतल्याचे त्याने म्हटले आहे. हल्ल्यापूर्वी काही तासांपूर्वी विमानतळावरील कर्मचार्‍यांनी त्याला मदत केली होती. ऋतिक त्याची दोन मुले रेहान व रिधान यांच्यासह स्पेन व आफ्रिकेत सुट्टीसाठी गेला होता. काल सकाळी या संदर्भात त्याने ट्विट केले आहे.