मुख्यमंत्री वाढदिवसाचे सोहळे रद्द करणार का? ः पणजीकर

0
10

केरी समुद्रात चौघेजण बुडाल्याची घटना घडली असून पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रती सहवेदना देत मुख्यमंत्री त्यांचा वाढदिवस सोहळा रद्द करतील का? तसेच पर्यटनमंत्री रोहन खवटे जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणार का? असा सवाल काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.

केरी बीचवरील घटनेने किनारे सुरक्षा कंत्राटदाराने सदर समुद्रकिनाऱ्यांवर पुरेसे जीवरक्षक तैनात केले नव्हते हे सिद्ध झाल्याचा दावा पणजीकर यांनी केला आहे. काँग्रेस पक्षाने वेळोवेळी किनारा सुरक्षा आणि जीवरक्षक कंत्राट घोटाळा तसेच किनारा स्वच्छतेचा कंत्राट घोटाळा उघड केला आहे. केरी किनारी घडलेल्या घटनेने किनारे सुरक्षा कंत्राटदाराने सदर समुद्रकिनाऱ्यांवर पुरेसे जीवरक्षक तैनात केले नव्हते हे सिद्ध झाल्याचा दावा अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.