मुख्यमंत्री बनणार आता कुलपती

0
27

पश्‍चिम बंगालच्या मंत्रिमंडळाने मुख्यमंत्र्यांना सरकारी विद्यापीठांचे कुलपती बनवण्याच्या विधेयकाला मंजुरी दिली. यासंबंधीचे विधेयक विधानसभेत आणले जाईल, अशी माहिती बंगालचे शिक्षण मंत्री ब्रात्य बसू यांनी काल दिली. यापुढे सरकारी विद्यापीठांचे कुलपती राज्यपाल नव्हे, तर राज्याचे मुख्यमंत्री असणार आहेत. परिणामी ममता बॅनर्जी या कुलपती बनणार आहे.

गुरुवारी राज्य सचिवालयात मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना शिक्षणमंत्री म्हणाले की, राज्यपालांच्या जागी मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. . हा प्रस्ताव लवकरच पश्चिम बंगाल विधानसभेत विधेयकाच्या रूपात मांडला जाईल. राज्यपाल सध्या सरकारी विद्यापीठांचे कुलपती आहेत. मात्र, पश्चिम बंगाल विधानसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर ते राज्यपालांकडे त्यांच्या संमतीसाठी पाठवले जाते. त्यामुळे या विधेयकाला राज्यपाल मान्यता देतात की नाही, हे येणारा काळच सांगेल.