मुकाबला आसाममधील दहशतवादाचा

0
143

गेल्या काही वर्षांपासून आसाममध्ये प्रत्येक वर्षी २५० ते ३०० दहशतवादी हे मारले जातात. मध्यंतरी, आसाममध्ये एनडीएङ्गबीच्या (नॅशनल डेमोक्रॅटिक ङ्ग्रंट बोडोलँड) विरुद्ध ऍन्टी टेरेरिस्ट ऑपरेशन करण्यासाठी भारतीय सैन्याला तिथे पाठवण्यात आले आणि त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. उपलब्ध माहितीनुसार, ८४ दहशतवाद्यांना पकडण्यात आले आणि १४ दहशतवाद्यांना मारण्यात सैन्याला यश आले आहे. निश्‍चितच ही एक मोठी उपलब्धी म्हणता येईल. पण यामुळे आसाममध्ये होणारा हिंसाचार थांबेल का हा खरा प्रश्‍न आहे.आसाममध्ये ३६ दहशतवादी संघटना
आज आसाममध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या दहशतवादी संघटना काम करत आहेत. सरकारी आकडेवारीनुसार सध्या अशा ३६ दहशतवादी संघटना तेथे काम करत आहेत. यामधल्या १८ संघटना या आदिवासी आणि इतर जमाती यांच्या आहेत; तर उर्वरित १८ या जिहादी प्रवृत्तीच्या आहेत. यापैकी चार संघटना महत्त्वाच्या आणि अधिक धोकादायक आहेत. यातील पहिली म्हणजे युनायटेड लिबरेशन ङ्ग्रन्ट ऑङ्ग आसाम किंवा उल्ङ्गा. ही आसाम मधील सर्वांत मोठी संघटना आहे. या संघटनेचे १५० ते २०० दहशतवादी आसाममध्येच दडलेले असावेत, असा अंंदाज आहे. दुसरी संघटना म्हणजे नॅशनल डेमोक्रॅटिक ङ्ग्रंट बोडोलँड. त्यांचे आता तीन तुकडे झाले आहेत. सध्याचा हिंसाचार एनडीएङ्गबी या. संघटनेने केला होता. या संघटनेचेही दीड-दोनशे दहशतवादी आहेत. जिहादी संघटनांमध्ये सर्वांत महत्त्वाच्या दोन संघटना आहेत, त्या मुस्लीम युनायटेड लिबरेशन टायगर्स ऑङ्ग आसाम (मुल्ता) आणि जमाते उल् इस्लामी बांगलादेश पश्‍चिम बंगालमध्ये केलेले स्ङ्गोट याच संघटनेने केले होते. या दोन्हीही संघटनांच्या शस्त्रधारी दहशतवाद्यांची संख्या मोठी आहे. या सर्व दहशतवादी संघटनांचे उद्देश हे वेगवेगळे असतात. पण त्यांच्या सततच्या कारवायांमुळे आसाममध्ये गेली २५ वर्षे हिंसाचार सुरु आहे.
शासकीय स्वातंत्र्य दिले पण हिंसाचार थांबला नाही
उल्ङ्गा संघनटेला आसाम स्वतंत्र हवा आहे; परंतु त्यांची शक्ती क्षीण झाल्यामुळे ते हिंसाचार करण्याशिवाय दुसरे काहीही करु शकत नाहीत. उल्ङ्गा काही वर्षांपूर्वी बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध आंदोलन/हिंसाचार करत असे, पण त्यांचे कॅम्प बांगलादेशात असल्यामुळे सध्या ते आसाममध्ये आलेल्या इतर भारतियांनाच मारत आहेत. इतर ज्या जमाती संघटना आहेत त्या प्रत्येक संघटनेला आपल्या जमातीचे स्वतंत्र जिल्हे/राज्य किंवा देश हवेे आहेत. त्यांची इतरांच्या बरोबर राहण्याची इच्छा नाही. एनडीएङ्गबी या संघटनेने केलेल्या आंदोलनामुळे बोडोलँड टेरिटोरियल ऍटॉनॉमस डिस्ट्रीक्ट हा चार जिल्हे असणार्‍या भागाला जास्त शासकीय स्वातंत्र्य देण्यात आले. पण तरीही त्यामुळे हिंसाचार कमी झालेला नाही. कारण या भागात आणि आसामच्या जवळपास सर्वच भागामध्ये बांगलादेशींची घुसखोरी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे तेथील मूळचे रहिवासी आणि बांगलादेशी घुसघोर यांच्यामध्ये सातत्याने संघर्ष होत आहेत. गेल्या दहा वर्षांमध्ये अशा प्रकारच्या दहा मोठ्या घटना झाल्या. यातील आठ या बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध होत्या आणि दोन बोडोलॅन्डमध्ये राहणार्‍या इतर आदिवासी जमातींविरुद्ध होत्या. २०१४ मध्ये आसाममध्ये १८४ सामान्य नागरीक, ५ सैनिक आणि ११५ दहशतवादी मारले गेले. यामधले ९० टक्के सामान्य नागरिक हे बोडोलॅन्डमध्ये मारले गेले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये एनडीएङ्गबी संघटनेच्या दहशतवाद्यांची संख्या अधिक होती. गेल्या पाच वर्षामध्ये बोडोलँड टेरिटोरियल ऍटॉनॉमस डिस्ट्रीक्ट किंवा बीटीएडीमध्ये हजारहून जास्त लोक मारले गेलेले आहेत आणि १८०० हून जास्त व्यक्तींना किडनॅप केलेले आहे. याशिवाय मागील वर्षी म्हणजेच २०१४ मध्ये ७०० हून जास्त वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्रे सैन्याने या भागातून जप्त केली आहेत. एका अंदाजाप्रमाणे आजही या भागात त्याहून १० पट शस्त्र वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांकडे आहेत.
दहशतवादी प्रशिक्षणाचे कॅम्पस् उद्ध्वस्त करा
आसाममध्ये होणार्‍या हिंसाचाराचे अनेक प्रकार आहेत; मात्र आसामचे रहिवाशी विरुद्ध बांगलादेशी घुसखोर आणि तेथील अनेक जातीजमातींमधील संघर्ष या दोन कारणांमुळे तेथे मोठे हिंसाचार होत असतात. सध्या आसाममधील उल्ङ्गा या सर्वांत मोठी दहशतवादी संघटनेचे प्रशिक्षणाचे कॅम्प हे बांगलादेश आणि म्यानमारमध्ये आहेत. सीमा सुरक्षा दलाने (बीएसएङ्ग) दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशच्या चितगावच्या जंगलात ७० ते ८० दहशतवादी प्रशिक्षणाचे कॅम्पस् असावेत. याशिवाय ४० ते ४५ दहशतवादी प्रशिक्षणाचे कॅम्प म्यानमारच्या जंगलात आहेत. या दोन राष्ट्रांशी केलेल्या मैत्रीचा ङ्गायदा घेऊन भारताने हे दहशतवादी प्रशिक्षणांचे अड्डे लवकरात लवकर उद्ध्वस्त करण्याची आवश्यकता आहे.
या ३६ दहशतवादी संघटनांखेरीज आसामसाठी आणखी एक धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. अलीकडील काळात तेथे माओवादीही शिरकाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. माओवाद हा मध्य भारतात पसरलेला आहे. ज्या भागामध्ये आदिवासी किंवा वनवासी जास्त संख्येने राहतात तेथे माओवाद्यांच्या कारवाया अधिक प्रमाणात होताना दिसतात. अशा प्रकारचे आदिवासी ईशान्य भारतात खास करुन आसाममध्येही आहेत. त्यामुळेच माओवादी दहशतवाद्यांची आसाममध्ये शक्ती वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही. गेल्याच वर्षामध्ये ७० हून जास्त माओवादी समर्थकांना आसाममधून पकडण्यात आले होते. शक्यता ही आहे की आपले रक्षण एनडीएङ्गबी पासून करण्यासाठी माओवाद्याची मदत घेऊ शकतात.
सर्वाधिक धोका जिहादी दहशतवादी संघटनांचा
आज आसामला सर्वांधिक धोका जिहादी दहशतवादी संघटनांचा आहे. नॅशनल इनव्हेस्टिगेशन एजन्सीने (एनआयए) दिलेल्या माहितीप्रमाणे पश्‍चिम बंगालच्या वर्धमान जिल्ह्यामध्ये झालेल्या स्ङ्गोटांमध्ये अशी माहिती मिळाली आहे की, आसाममध्ये बोडोलॅन्डच्या नेत्यांना मारण्याकरिता जेएनने २०० हून जास्त बॉम्ब तयार केले होते. एका दहशतवादी संघटनेच्या माध्यमातून त्यातील काही बॉम्ब आसाममध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला होता. पण या दहशतवादी नेत्याला पकडण्यात आले आणि ते बॉम्ब जप्त करण्यात आले. त्यामुळेच आपल्याला जिहादी धोक्याबाबत अत्यंत सजग राहण्याची गरज आहे.
जिहादी धमक्यांमुळे बांगलादेशीविरोधी अभियान थांबले
आज आसामची ४० टक्के लोकसंख्याही बांगला देशी आहे. यातील बेकायदेशीररित्या घुसखोरी केलेल्या बांंगलादेशींना पकडून भारताच्या बाहेर पाठवण्यात येईल, असे नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकांदरम्यान सांगितले होते.