मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी चार फरार आरोपींना अटक

0
10

१९९३ साली देशाला हादरवून सोडणारी साखळी बॉम्बस्फोटाची घटना मुंबईत घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत अनेक आरोपींना अटक केली आहे; पण या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील काही आरोपी फरार झाले होते. या प्रकरणी गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली असून, चार आरोपींना अटक केली आहे.

संबंधित आरोपी मागील २९ वर्षांपासून फरार होते. गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. अबू बकर, युसूफ भटका, शोएब कुरेशी उर्फ शोएब बाबा आणि सय्यद कुरेशी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मागील जवळपास दोन दशकाहून पोलीस या आरोपींचा शोध घेत होते.