मुंबई झाली जलमय

0
139

कोरोनाशी दोन हात करणारी मुंबई कालपासून कोसळणार्‍या मुसळधार पावसामुळे जलमय झाली आहे. रेल्वे ट्रॅक पूर्ण पाण्याने भरले, तसेच रस्ते पाण्याखाली गेले. अनेक झोपडपट्ट्यांतील घरांत पाणी शिरल्याने तारांबळ उडाली.

येथे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना आदी बंद ठेवण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले होते. कांदिवलीजवळील पश्चिम द्रुतगती महामार्गावर काल सकाळी दरड कोसळली.