मुंबई-करमळी दरम्यान २२ पासून

0
100

>> अत्याधुनिक सोयी-सुविधांनीयुक्त मेट्रो ट्रेन

अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज अशी ‘तेजस एक्स्प्रेस’ २२ मेपासून कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते करमाळी (उत्तर गोवा) दरम्यान धावणार आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी काल नी दिल्लीतील सङ्गदरजंग स्थानकात या गाडीची पाहणी केली. या गाडीत अनेक अतिरिक्त सुविधा देण्यात आल्यामुळे इतर गाड्यांपेक्षा या गाडीचे भाडं जास्त ठेवण्यात आल्याची माहिती यावेळी श्री. प्रभू यांनी दिली.
तेजस एक्स्प्रेसची ताशी २०० कि.मी. वेगाने धावण्याची क्षमता असून रूळांची तेवढी क्षमता नसल्याने तूर्त ताशी १३० कि.मी. वेगाने ही गाडी धावणार आहे. रेल्वेत मेट्रोप्रमाण दरवाजे असतील. गाडीला सरकते दरवाजे असतील आणि त्यांचे नियंत्रण गार्डकडे असेल. विमानाप्रमाणे या गाडीच्या प्रत्येक सीटच्या मागे एलसीडी स्क्रीन तसेच गाडीत वायङ्गाय सुविधाही देण्यात आली आहे. गाडीत हवाई सुंदरीप्रमाणे अटेंडंट ठेवण्यात आले आहेत. तसेच पुढच्या स्टेशनचीही माहिती आधी मिळू शकेल.