Home बातम्या मुंबईवरील दहशतवादी हल्ला पाकिस्तानी पथक फेब्रुवारीत भारतात

मुंबईवरील दहशतवादी हल्ला पाकिस्तानी पथक फेब्रुवारीत भारतात

0

२६/११च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ला प्रकरणी पाकिस्तानचे न्यायालयीन पथक फेब्रुवारीत भारत भेटीवर जाणार असल्याची माहिती पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलिक यांनी दिली आहे.

दि. ३ ते ६ फेब्रुवारी दरम्यान, भारतात येणारे हे तीन सदस्यांचे पथक या हल्ल्यातील साक्षीदार तसेच भारतीय तपास यंत्रणांकडून माहिती नोंद करून घेणार आहे. या पथकात तपासकामाठी भारतात जाऊ दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले आहेत.

दरम्यान, मुंबई हायकोर्टाने पाकिस्तानी पथकाने भारतात येऊन तपास करण्यास परवानगी दिली होती. २००८ मधील या हल्ल्यात १६६ जण ठार झाले होते.