Home बातम्या मायरॉन रॉड्रिग्जविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस

मायरॉन रॉड्रिग्जविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस

0

राज्यातील सुमारे 100 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणामध्ये संशयित आरोपी मायरॉन रॉड्रिग्ज याच्याविरोधात इंटरपोलद्वारे रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 406, 420 सह 34 आणि गोवा ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण कायद्याच्या कलम 3 आणि 5 अंतर्गत गुन्ह्यांसाठी पणजी येथील आर्थिक गुन्हे विभागाने मायरॉन रॉड्रिग्ज आणि त्याची पत्नी दीपाली परब या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक गुन्हा विभागाने या प्रकरणात 25 फेब्रुवारी 2025 रोजी मडगाव येथील प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायालयात दोघांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होती. मायरॉन रॉड्रिग्ज याने विदेशात पलायन केले आहे. त्याला अटक करणे सुलभ व्हावे, यासाठी सुरुवातीला ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. आता, इंटरपोलद्वारे रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे.