Home बातम्या माझी मुलगी ‘त्या’ पदासाठी पात्र : क्रीडामंत्री आजगावकर

माझी मुलगी ‘त्या’ पदासाठी पात्र : क्रीडामंत्री आजगावकर

0

नियुक्ती नियमबाह्य असल्याचे सिद्ध करा

मीता आजगावकर ही आपली कन्या असली तरी क्रीडा खात्यातील ज्युनियर सायंटिफीक ऑफिसरची तिची झालेली नियुक्ती कायदेशीर असून मीता त्या पदासाठी पात्र असल्याचे क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

भाजप प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर यांच्याकडून आरोपांची अपेक्षा नव्हती. त्यांचा बोलविता धनी वेगळा असल्याचा आरोप करून गैरप्रकार करून मीताची नियुक्ती केल्याचे सिद्ध करून दाखविल्यास सदर पद रद्द करण्यास आपली हरकत नाही, असे आजगावकर यांनी सांगितले.

मीता कार्यक्षम असून ती शिकलेली आहे. नियुक्ती संबंधीची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने झाली असून आपण मुळीच हस्तक्षेप केलेला नाही व नियमांचे उल्लंघनही केलेले नाही, असे आजगावकर यांनी सांगितले.पेडणे मतदारसंघातील कार्यकर्ते, मतदार यांच्याकडून मिळत असलेला पाठिंबा पाहून भाजप नेत्यांच्या पायाखालील वाळू सरकत आहे. त्यामुळेच ते खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

भाजप प्रवक्ते आर्लेकर यांनी परवा आजगावकर यांनी आपल्या मुलीची क्रिडा खात्यात बेकायदेशीरपणे नियुक्ती केल्याचा आरोप केला होता.