भाषणबाजीने भ्रष्टाचार मिटणार नाही

0
72

सोनियांचा टोला

भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या आरोपांना टाळत आलेल्या यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आपले मौन काल सोडले. भ्रष्टाचार केवळ भाषणबाजी करून मिटू शकत नाही असा टोला त्यांनी अप्रत्यक्षपणे अण्णांना लगावला.

उत्तराखंड येथील जाहीर सभेवेळी त्यांच्यावतीने संरक्षणमंत्री ए. के. अँथनी यांनी त्यांचे भाषण वाचून दाखवले. श्रीमती गांधींना ताप आल्यामुळे त्या कार्यक्रमात उपस्थित राहू शकल्या नाहीत त्यामुळे त्यांचे भाषण अँथनी यांची वाचून दाखवले.

हल्लीच्या दिवसांत लोक भ्रष्टाचाराविरोधात खूप बोलतात. भ्रष्टाचार हा एक विकार आहे आणि त्याचा दुष्परिणाम समाजाला भोगावा लागतोय ही वस्तुस्थिती आहे. मात्र तरीही केवळ भाषणबाजी करून भ्रष्टाचार मिटणार नाही. लोकपालसाठी राष्ट्रीय सल्लागार समिती पंतप्रधानांकडून स्थापण्यात आली आहे. लोकपाल विधेयक सर्वप्रथम तिथे तयार झाले. आम्ही लोकपाल देण्यास बांधील आहोत, पण हा इतका गोंधळ कशाला, असे त्या म्हणाल्या.