महाराष्ट्रात कोरोनाबाबतचे निर्बंध उद्यापासून हटवणार

0
11

>> राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

महाराष्ट्रातील कोरोनाबाबतचे निर्बंध उद्या गुढीपाडव्याच्या दिवसापासून पूर्णत: हटवण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, मास्कचा वापर मात्र ऐच्छिक ठेवण्यात आला आहे.

आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध गुढीपाडव्यापासून म्हणजेच उद्या शनिवार दि. २ एप्रिलपासून पूर्णपणे उठवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.

दरम्यान, मुंबई लोकलमधून प्रवास करण्यासाठी पूर्वी दोन डोस घेणे आवश्यक होते. तसेच दोन डोस घेऊन १४ दिवस पूर्ण होणे गरजेचे होते. त्यानंतरच संबंधितांना लोकलमधून प्रवास करण्याची मुभा होती. परंतु राज्य सरकारच्या कालच्या निर्णयानुसार मुंबई लोकलमधून प्रवास करण्यासाठी दोन डोस घेतलेल्या लशीच्या प्रमाणपत्राची गरज नाही.

कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध मागे घेण्यात आलेले आहेत. पण जरी निर्बंध मागे घेण्यात आलेले असले तरी प्रत्येकाला काळजी घ्यावी लागणार आहेत. कुणीही बेजबाबादारपणे वागू नये, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.