महाराष्ट्रात काही दिवस तरी कडक निर्बंध ः मुख्यमंत्री

0
152

राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काही दिवस तरी कडक निर्बंध घालण्यात येणार असल्याचे काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
काल मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्याच्या टास्क फोर्ससमवेत ऑनलाईन बैठक घेतली. यात ऑक्सिजन उपलब्धता, रेमडेसीवरचा वापर, बेड्सची उपलब्धता, उपचार पद्धती, सुविधा वाढविणे, निर्बंध लावणे, कडक दंडात्मक कार्यवाही करणे आदी मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. बैठकीत मुख्यंत्र्यांनी प्रशासनाला काही विशेष निर्देशदेखील दिले.

मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या वर्षभरापासून आपण कोविड्शी लढा देताना सुविधा वाढविल्या, चाचण्या वाढवल्या, मोठ्या प्रमाणावर आरोग्याचे नियम पाळावेत यादृष्टीने जनजागृती केली, अनेक मुद्द्यांवर कार्यवाही केली आहे. आता वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करून यासंदर्भात सर्वसमावेशक कार्य पद्धती (एसओपी) तयार करण्यात येईल. आत्ता या क्षणी असलेल्या लाटेला थांबविण्यासाठी आपल्याला कडक निर्बंध काही काळासाठी का होईना लावावेच लागतील, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलून दाखवले.

तसेच, लसीकरण वाढविण्यासाठी महाराष्ट्राला अधिक लसींचा पुरवठा व्हावा अशी विनंती परत एकदा आपण पंतप्रधानांना करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.