महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अंतुले यांचे निधन

0
509

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अ. र. अंतुले यांचे काल दीर्घ आजाराने वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले.१९८० ते १९८२ या काळात अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात अल्पसंख्याक व्यवहार मंत्री होते. मूत्रपिंड विषयक रोगाने आजारी असलेल्या अंतुले यांच्यावर खाजगी इस्पितळात उपचार चालू होते. बुधवारी त्यांच्या पार्थिवावर रायगड जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत.