उगेंतील बेकायदा खनिज वाहतूक बंद करण्याची मागणी

0
221

‘ट्रांजिट’ पासविना मार्ग बदलून वाहतूक
सांगे तालुक्यातील उगें गावातील तोलये खाणीवरील ई-लिलाव केलेल्या खनिजाच्या साठ्याची ‘ट्रांजिट’ पास नसताना बेकायदेशीरपणे वाहतूक केली जात असून सरकारने ती ताबडतोब बंद करावी, अशी मागणी उगेवासियांचे प्रतिनिधी फ्रान्सिस कार्व्हालो यांनी काल पत्रकार परिषदेत केली.
बेकायदेशीर वाहतूक लोकांच्या लक्षात येऊ नये म्हणून वाहतुकीचा रस्ताही बदलला आहे. या प्रकरणी खाण खात्याकडे तसेच पोलिसांकडे तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही, असे कार्व्हालो यांनी सांगितले.आमदार, पोलिसांच्या संगनमताचा संशय
यापूर्वी कावरे-पिर्ला येथेही असाच प्रकार घडला होता. तेथील नागरिकांनी विरोध केल्याने पोलिसांनी त्यांचा छळ केला, असा आरोप रवींद्र वेळीप यांनी यावेळी केला. स्थानिक आमदार, पोलीस यांच्या संगनमतानेच हा प्रकार होत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. खनिज वाहतुकीच्या बाबतीत नियमांचे उल्लंघन होत असल्याचे त्यांनी सांगितले. वाहतुकीच्या बाबतीत स्थानिक ट्रकवाल्यांनाही विश्‍वासात घेतलेले नाही, असे कार्व्हालो यांनी सांगितले.