महायुतीबाबत अद्याप ठोस काहीच नाही

0
93

भाजप-शिवसेना महायुतीला संकटातून सावरण्यासाठी आता भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी पुढाकार घेत आपल्या पक्षाच्या मागणीत ५ जागांची कपात केल्याचे वृत्त आहे. शिवसेना अध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्याशी शाह या संदर्भात बोलल्याचेही या वृत्तात म्हटले आहे.
शिवसेने स्वत:साठी १५१ व भाजपाला ११९ जागांचा प्रस्ताव दिला होता. मात्र भाजपची मागणी १३५ जागांची होती. आता त्यापैकी ५ जागा कमी करण्याची भाजपची तयारी असल्याचे अमित शाह यांनी ठाकरे यांना सांगितल्याचे वृत्त आहे. शिवसेनेने गेल्या २५ वर्षांत न जिंकलेल्या जागाही चालतील असे भाजपने म्हटल्याचे सांगण्यात आले.
महाराष्ट्राचे भाजप प्रभारी राजीव प्रताप रूडी यांनी याबाबत पत्रकारांना माहिती दिली. ‘शाह या संदर्भात ठाकरे यांच्याशी बोलले आहेत. यावरून भाजप युतीसाठी उत्सुक आहे हे स्पष्ट आहे’ असे ते म्हणाले. आपण महायुती कायम राहील याबाबत आशावादी असल्याचे त्यांनी सांगितले.