महामार्गाच्या प्रश्नावरून भोम ग्रामसभेत गदारोळ

0
13

भोम ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत नियोजित राष्ट्रीय महामार्गाच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा वादावादी झाली. अखेर, मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठांची भेट घेण्याचा निर्णय काल ग्रामसभेत घेण्यात आला.
भोमचे सरपंच दामोदर नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेत स्थानिक ग्रामस्थांनी नियोजित नवीन राष्ट्रीय महामार्गाचा विषय उपस्थित केला. नवीन महामार्ग तयार करताना पाडण्यात येणाऱ्या घरांबाबत योग्य स्पष्टीकरण करण्यात न आल्याने सरपंच नाईक यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. नवीन महामार्गाच्या आराखड्याबाबत सविस्तर माहिती देण्याची विनंती लावून धरली. यावेळी वादावादीला सुरुवात झाल्याने पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. नवीन महामार्गाबाबत ग्रामस्थांना अंधारात ठेवले जात आहे, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली. या महामार्गाबाबत केंद्र सरकारच्या पत्र पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.