महात्मा फुले, कांशीराम यांना भारत रत्न द्या : मायावती

0
65

महात्मा ज्योतिबा फुले व बसप नेते कांशीराम यांना मरणोत्तर भारत रत्न पुरस्कार देण्याची मागणी बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी केली आहे. केंद्र सरकार जर मदन मोहन मालवीय यांना मरणोत्तर भारत रत्न बहाल करू शकते तर फुले व कांशीराम यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात यावे अशी मागणी मायावती यांनी एका पत्रकार परिषदेत केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर दलितांच्या उद्धारासाठी कांशीराम यांनी मोठे योगदान दिल्याचा दावा त्यांनी केला. तसेच अखेरच्या श्‍वासापर्यंत अविरतपणे मागासवर्गीय व महिलांच्या समानतेसाठी कार्य केलेल्या ज्योतिबा फुले यांचाही मरणोत्तर गौरव करण्याची मागणी मायावती यांनी केली.