पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पंडित नेहरूंचे गुणगान

0
76

भारताचे पहिले पंतप्रधान दिवंगत पं. जवाहरलाल नेहरू यांनी नेहमी विज्ञान व तंत्रज्ञानाला प्राधान्य देत भारताला सक्षम बनविण्याचा प्रयत्न केला अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल येथे आयोजित एका सोहळ्यात नेहरूंवर स्तुतीसुमनांची उधळण केली. मुंबई विद्यापीठाच्या भारतीय विज्ञान परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात मोदी बोलत होते. विज्ञानाची कास धरल्यास भारत जगात अग्रस्थान निश्‍चितच प्राप्त करू शकेल. आपल्या भाषणात मोदी यांनी भारतीय शास्त्रज्ञांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. भारताने पहिल्याच प्रयत्नात मंगळयान मोहीम फत्ते केली ही अभिमानास्पद बाब असल्याचे ते म्हणाले. संशोधनाला प्रोत्साहन देणे गरजेचे असून योग्य वेळी निधी मिळणेही तेवढेच महत्त्व आहे असेही मोदी म्हणाले.