आंतोन गावकर यांचे निधन

0
72

माजी आमदार व मूळ गोंयकाराच्या एकवटचे अध्यक्ष आंतोन गावकर यांचे काल दुपारी निधन झाले. कित्येक महिन्यांपासून ते आजारी होते. युगोडेपाच्या तिकिटावर कुडतरीतून ते निवडून आले होते. ते राय पंचायतीचे तीस वर्षे सरपंच होते. सेव्ह गोवा पक्षाच्या अस्तित्वासाठी कोर्टातही त्यांनी कायदेशीर प्रयत्न चालविले होते. मागासजात जमातीच्या हक्कासाठी नोकर्‍या व राजकारणात आरक्षणासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. त्यासाठी लढाही दिला होता.