महत्त्वाचे काय? देश की धर्म

0
18

>> उच्च न्यायालयाचा सवाल

देशभरात हिजाब प्रकरणावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मद्रास उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. हिंदूंच्या मंदिरांमध्ये हिंदूंशिवाय इतर सगळ्यांना प्रवेश बंदी करण्याची मागणी करणारी याचिका मद्रास उच्च न्यायालयासमोर काल सुनावणीसाठी आली असता, न्यायालयाने याचिकाकर्त्यांनाच चांगलेच फटकारले. जास्त महत्त्वाचे काय आहे? देश की धर्म? असा सवाल न्यायालयाने याचिकाकर्त्यांना विचारला. हिजाब प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मद्रास न्यायालयाची ही टिप्पणी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
तामिळनाडूमधील मंदिरांमध्ये हिंदू नसलेल्या व्यक्तींना प्रवेश दिला जाऊ नये, असा आदेश देण्याची मागणी करणारी याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल झाली होती. न्यायमूर्ती मुनीश्वर नाथ भंडारी आणि न्यायमूर्ती डी. भारत चक्रवर्ती यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. महत्त्वाचे काय आहे? देश की धर्म? कुणीतरी हिजाबच्या मागे जात आहे, तर कुणी धोतीच्या मागे जात आहे, हे धक्कादायक आहे, असे न्यायालयाने यावेळी नमूद केले.