Home Featured मराठी हवी असल्यास महाराष्ट्रात जावे म्हणणाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंद

मराठी हवी असल्यास महाराष्ट्रात जावे म्हणणाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंद

0

डॉ. घोडकिरेकर यांच्या तक्रारीवरून कारवाई

‘ज्यांना मराठी हवी त्यांनी महाराष्ट्रात जावे’ अशी पोस्ट फेसबुकवर टाकून दोन भाषिक गटांमध्ये शत्रुत्व निर्माण करण्याच्या प्रयत्न केल्याच्या आरोपावरून प्रकाश नाईक नामक इसमाविरुद्ध म्हार्दोळ पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. भारतीय न्यायसंहितेचे कलम 196 (1) (अ) आणि (ब) खाली हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हा दखलपात्र असून दोषी सिद्ध झाल्यास तीन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद कायद्यात आहे.

विविध धार्मिक, वांशिक, भाषिक किंवा प्रादेशिक गटांत वा जातींमध्ये किंवा समाजांमध्ये असहिष्णुता, शत्रुत्व वा द्वेषभावना निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास तो भारतीय न्यायसंहितेच्या उपरोक्त कलमाखाली गुन्हा ठरतो.
यासंदर्भात सदर फेसबुक पोस्टविरुद्ध गोमंतक मराठी भाषा परिषदेचे डॉ. मधु घोडकिरेकर यांनी म्हार्दोळ पोलिसांत रीतसर तक्रार नोंदवली होती. त्याअनुषंगाने सदर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.