मनपाचा आरोप धादांत खोटा ः कुंकळ्ळेकर

0
118

अमृत योजनेला पूर्ण पाठिंबा देण्याचा तसेच योजनेखालील सर्व प्रकल्पांना मंजुरी देण्याचा ठराव महापौर सुरेंद्र ङ्गुर्तादो यांच्या नेतृत्वाखालील पणजी महापालिका मंडळाने घेतला होता. त्यामुळे त्या संदर्भात महापालिकेला अंधारात ठेवण्यात आल्याचा पणजी महापालिकेतील सत्ताधारी गटाने केलेला आरोप खोटा असल्याचे पणजीचे आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर यांनी काल सांगितले.

केंद्र सरकारच्या अमृत योजनेला पूर्ण पाठिंबा देण्याचा ठराव पणजी महापालिकेने घेतला होता. त्याशिवाय राज्यस्तरीय तांत्रिक समिती तसेच उच्चाधिकार समिती व मंत्रिमंडळाने अमृत योजनेखालील सर्व प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे खोटे आरोप करून पणजी महापालिकेने पणजी शहराच्या विकासात खो घालण्याचा प्रयत्न करू नये असा सल्ला कुंकळ्ळेकर यांनी दिला.
आझाद मैदान म्हणजे पणजीची शान आहे. या मैदानाच्या सुशोभीकरणाला विरोध करणे म्हणजे गोवा मुक्तीलढ्यात भाग घेतलेल्या तसेच गोव्याच्या मुक्तीलढ्यात बलिदान दिलेल्या थोर अशा स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान आहे. त्यामुळे महापालिकेने या मैदानाच्या सुशोभिकरणाला विरोध करू नये, असे कुंकळ्ळेकर म्हणाले. तो अडवून धरण्याचा कुणी प्रयत्न करू नये, असे ते म्हणाले.