Home बातम्या मध्यप्रदेशात कारने 13 मजुरांना चिरडले

मध्यप्रदेशात कारने 13 मजुरांना चिरडले

0

2 मजुरांचा जागीच मृत्यू, 11 जण गंभीर जखमी

मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये काल रविवारी एका भरधाव वेगाने येणाऱ्या कारने 13 मजुरांना चिरडले. या अपघातात 2 मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर 11 मजूर जखमी झाले. जखमींपैकी 7 जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हा अपघात बरेला पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एकता चौकात दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, मृतांची ओळख पटली आहे. मृत आणि सर्व जखमी मंडला जिल्ह्यातील बीजाडांडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बिहारिया गावाचे रहिवासी आहेत. ते दीड महिन्यापासून येथे मजुरी करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, मजूर रस्त्याच्या दुभाजकावर लावलेल्या लोखंडी जाळ्या साफ केल्यानंतर बसून जेवण करत होते. त्याचवेळी बरेला येथून जबलपूरच्या दिशेने येणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या कारने त्यांना चिरडून पळ काढला.

स्थानिक नागरिकांनी तात्काळ बरेला पोलिस ठाणे आणि डायल 108 ला माहिती दिली. माहिती मिळताच, पोलिस ठाण्याचे प्रभारी अनिल पटेल पोलिस पथकासह घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना रुग्णालयात पाठवले. हा अपघात एवढा भीषण होता की प्रवाशांना सावरण्याची संधीच मिळाली नाही. घटनेची माहिती मिळताच महुआडांड पोलीस ठाण्याचे प्रभारी मनोज कुमार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस प्रशासनाकडून घटनेची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. मदतकार्यासाठी घटनास्थळी तात्काळ रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या असून, जखमींना रुग्णालयात हलवण्यात येत आहे.
बसमधील लोक छत्तीसगडमधील बलरामपूर येथून लोध फॉल या पर्यटनस्थळाला भेट देण्यासाठी निघाले होते. अपघातग्रस्त बस ही बलरामपूर येथील ज्ञान गंगा हायस्कूलची स्कूल बस होती.

झारखंडमध्ये बस अपघातात 5 महिलांचा जागीच मृत्यू

झारखंडमध्ये झारखंडमधील लातेहार जिल्ह्यातील महुआडांड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ओरसा व्हॅलीत बस उलटून भीषण अपघात झाला. या घटनेत 5 महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. बसमध्ये 80 लोक बसलेले होते. आतापर्यंत पाच महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, बसखाली आणखी मृतदेह असण्याची शक्यता आहे. तर काही जखमी प्रवासीही बसखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याचेही वृत्त आहे. याशिवाय, मोठी जीवितहानी झाल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.