राज्यातील मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण केले जाणार आहे. राज्यात एकूण मतदान केंद्रांची संख्या आता 1,731 एवढी होणार आहे. त्यात उत्तर गोव्यात 820 आणि दक्षिण गोव्यात 911 मतदान केंद्रे असणार आहेत. राज्यात 8 नवीन मतदान केंद्राची निर्मिती केली जाणार असून, 2 मतदान केंद्रे वगळण्यात येणार आहेत. राज्यात सध्या 1725 मतदान केंद्रे आहेत.