मडगावातील ‘त्या’ पेट्रोल पंपांवर लवकरच कारवाई : मुख्याधिकारी

0
92

मडगाव पालिकेच्या जागेत असलेल्या हिंदुस्थान पेट्रोलियम व भारत पेट्रोलियमचे प्रत्येकी दोन पेट्रोल पंपांकडून भाड्यापोटी ८८ लाख रुपये पालिकेला येणे असल्याने पालिकेने त्यांच्या विरोधात कडक पाऊले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेने त्यांना नोटीस पाठवूनही ती रक्कम न भरल्याने येत्या मंगळवारी त्या पेट्रोलपंपांना सील ठोकण्यात येईल अशी माहिती मुख्याधिकारी नवीन लक्ष्मण यांनी दिली. या संदर्भात कायदा सल्लागाराचा सल्ला घेणार असेही त्यांनी सांगितले. या दिवसात घरपट्टी, पालिकेच्या दुकानांचे भाडे व विविध करापोटी १० कोटी रुपयांची थकबाकी पालिकेला येणे होती. या दोन महिन्यात दोन कोटी रुपये वसूल करण्यात यश मिळाले आहे व शेष थकबाकी वसूल करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.
गांधी मार्केटात दुकान भाड्यापोटी हजारो रुपये येणे आहेत. ती वसूल करण्यासाठी कठोर पाऊले उचलण्याचे ठरविले आहे.