मच्छिमारांच्या समस्या जाणण्यासाठी मच्छिमार संवाद कार्यक्रम

0
169

राज्यातील पारंपारिक मच्छीमाराच्या समस्या, तक्रारी जाणून घेण्यासाठी मच्छीमार संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे, अशी माहिती मच्छीमारी मंत्री विनोद पालयेकर यांनी दिली.
मत्स्यपैदाशीद्वारे युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. मच्छीमार बांधवाना मच्छीमारी खात्याच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त मिळवून देण्यासाठी योजनाचा आढावा घेऊन आणखीन सुटसुटीत करण्यात येणार आहेत. मागील दहा वर्षातील योजना, सवलतींचा ङ्गेरआढावा घेतला जाणार आहे. मच्छीमार संवाद कार्यक्रम पुढील महिन्यापासून सुरू केला जाणार आहे. मच्छीमार सचिव व अधिकारी पारंपारिक मच्छीमाराच्या समस्या जाणून घेणार आहेत. पारंपारिक मच्छीमारांना प्रोत्साहन देण्याची योजना आहे, असेही मंत्री पालयेकर यांनी सांगितले.
मच्छीमारी खात्यातर्ङ्गे फ्लोटींग जेटी उभारण्याचा प्रस्ताव आहे. गोवा राज्य साधन सुविधा विकास महामंडळाने बांधलेल्या ओल्ड गोवा, कांपाल येथील फ्लोटींग जेटीची पाहणी मच्छीमारी मंत्री पालयेकर यांनी केली. यावेळी ईडीसीचे अध्यक्ष सिध्दार्थ कुंकळ्येकर यांची उपस्थिती होती. दरम्यान, चापोली धरणाजवळ जलाशयात केज कल्चरचा शुभारंभ मच्छिमारी मंत्री पालयेकर यांच्या हस्ते गुरूवारी करण्यात आला आहे.