मंत्रिपुत्र आशिष मिश्राची पोलीस कोठडीत रवानगी

0
29

लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणातील मुख्य संशयित आशिष मिश्रा याची ३ दिवसांची पोलीस कोठडी रवानगी करण्यात आली आहे. लखीमपूरच्या सीजेएम न्यायालयाने आशिष मिश्राला १२ ते १५ ऑक्टोबरपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आशिष मिश्राच्या तीन दिवसांच्या कोठडीसंदर्भात काही अटीही घालून देण्यात आल्या आहेत. त्याला एसआयटीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे न्यायालयासमोर सादर केले होते.