कदंब खरेदी करणार आठ वॉल्वो-आरामदायी बसेस

0
72

मुंबई व बेंगलोरसह आंतरराज्य मार्गांसाठी कदंब महामंडळ चार वॉल्वो व चार लक्झरी (आरामदायी) बसेस् खरेदी करणार असल्याचे कदंब महामंडळाचे चेअरमन आमदार कार्लुस आल्मेदा यांनी काल सांगितले.या बसेस् खरेदी करण्यासाठी गोवा सरकार कदंब महामंडळाला ५ कोटी रु. देणार असून हा निधी यापूर्वीच मंजूर झालेला आहे. दरम्यान, बसेस् खरेदी करण्यासाठीची प्रक्रिया येत्या १० दिवसांत सुरू होणार आहे. चार वॉल्वो बसेस्‌पैकी २ बेंगलोर मार्गासाठी तर २ मुंबई मार्गासाठी असतील. मुंबईसाठीच्या बसेस् सध्या महामंडळाने कंत्राटी पद्धतीवर चालवायला दिलेल्या असल्या तरी या दोन वॉल्वो बसेस् मात्र महामंडळ स्वत:च चालवणार असल्याचे आल्मेदा यानी स्पष्ट केले.
लक्झरी बसेस्‌पैकी २ बसेस् गोवा -शिर्डी -पुणे मार्गासाठी असतील, तर अन्य बसेस् बेळगाव व अन्य मार्गासाठी असतील, अशी माहिती आल्मेदा यांनी दिली.